महाराष्ट्र

सैन्यातील जवान देशाचे भूषण – सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर

Anil Makwana

नायगांव

नायगांव बाजार ) १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय सैन्य दलातील जवान
मा.देविदास साबने यांचा शिवानंद पांचाळ नायगांवकर यांच्याहस्ते शाल श्रीफळ हार देवून गौरव व सन्मान करण्यात आला, स्वतःची व कुटुंबाची पर्वा न करता जिवाची बाजी लावून तुम्ही देशाची मान गर्वाने उंचावता, देशाच्या संरक्षणासाठी तुम्ही लढता, तुमच्या कार्याची कुणीही किंमत करू शकत नाही, देशसेवेचे स्वप्न साकारण्यासाठी तुम्ही जे कष्ट घेतले आहे, त्याचा आम्हा सर्व देशवासियांना अभिमान आहे, नांदेड जिल्ह्यासह नायगांव तालुक्याच्या मातीतील‌ तरुण बांधव देशसेवेत जात आहेत, ही‌ कौतुकास्पद बाब आहे, सैनिक बांधवांनो तुम्ही देशासाठी हिऱ्यापेक्षा मौल्यवान आणि भारताचे भूषण आहात, भारतीय जवानामुळे आम्ही सर्वजण जीवन सुखी समाधानाने जगत आहोत असे मत सामाजिक कार्यकर्ते – शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी व्यक्त केले, नायगांव तालुक्यातील पिंपळगांवचे ‌ भूमिपुत्र असलेले भारतीय जवान देविदास साबने म्हणाले स्वातंत्र्यदिनानिमित्त माझा आपुलकीने सन्मान झाला याचा गर्व नक्कीच आहे, भारतीय सैन्य दलात कर्तव्यदक्ष सेवा देत आहोत याचा मला अभिमानही आहे, असे मत व्यक्त केले, यावेळी म.से.स संभाजी ब्रिगेड चे नायगांव तालुकाध्यक्ष गौतम भाऊ वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ सूर्यवंशी, भीमराव दादा लाडके, आसिफ शेख, अनिल हनुमंते, राजपाल सोनटक्के, राजू बैलकर, अंकुश कहाळेकर , राजू माने, लालू गायकवाड, सुनील सोनकांबळे, आबेद शेख, अविनाश साबणे,
आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते,

Related Articles

Back to top button