महाराष्ट्र

नांदेड जिल्ह्यातील गोरगरिब असलेल्या घरगुती विजधारकांची विज पुरवठा खंडीत करणे थांबवा सामाजिक कार्यकर्ते – शिवानंद पांचाळ नायगांवकर यांची मागणी

Anil Makwana

नायगांव

Anil Makwana

सध्या नांदेड जिल्ह्यात कोविड- १९ ह्या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे नांदेड जिल्ह्यात कोविड -१९ रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ह्यामुळे जिल्ह्यातील गोरगरिबांकडे रोजगार होता त्यांचा रोजगारही ह्या कोविड -१९ ने हिरावून घेतला, त्यामुळे गोरगरिब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे त्यातच महावितरण कंपनीने नांदेड जिल्ह्यासह नायगांव शहर व तालुक्यात विजधारकांकडून विज बिल सक्तीने वसुली सुरू केली असून, विज बिल भरणा न केल्यास विज पुरवठा खंडीत करत आहेत,तरी नांदेड जिल्ह्यातील गोरगरिब असलेल्या घरगुती विजधारकांची विज पुरवठा खंडीत न करता त्यांना बिल भरणा करण्यासाठी सवलत द्यावी तसेच गोरगरिब विजधारकांची थकीत राहिलेल्या बिला संदर्भातील कारवाई थांबविण्यात यावे अशी आग्रही मागणी एका निवेदनाद्वारे, सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी मा.अधिक्षक अभियंता, महावितरण मंडळ कार्यालय नांदेड, मा, मुख्य अभियंता, महावितरण परिमंडळ नांदेड, मा, कार्यकारी अभियंता महावितरण विभाग देगलूर,यांच्यासह नायगांव बाजार येथील उप कार्यकारी अभियंता महावितरण यांनाही निवेदन देऊन मागणी केली आहे,या मागणीचे निवेदन देताना संभाजी शंकरराव पांचाळ उपस्थित होते, कोरोना महामारीच्या काळात २४ तास जनतेला विज पुरवठा देण्यासाठी महावितरण मधील सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, महावितरण मधिल आदींनी आपल्या जिवाची कुठलीही परवाना न करता जनतेसाठी २४तास विज पुरवठा राहावे म्हणून उल्लेखनीय भुमिका बजावत आहेत त्यांच्या कर्तव्यदक्ष कार्याची प्रशंसा शिवानंद पांचाळ यांनी करत पुढे म्हणाले की ज्या विजधारकांची आर्थिक परिस्थिती बरी आहे, त्यांनी आपले थकीत विजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे,आणि गोरगरिब असलेल्या विजधारकांना महावितरणने त्यांचा वीजपुरवठा खंडित न करता त्यांना सवलत देऊन सहकार्य करावे असे मत समाजिक कार्यकर्ता -शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले

Related Articles

Back to top button