परतीच्या पावसामुळे राज्यातील सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रूपये व ऊसाला हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या यासह घरांची पडझड झालेल्या बांधवांना व असंघटित शेतमजूर कामगारांनाही भरीव मदत द्या सामाजिक कार्यकर्ता :- शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी केले एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Anil Makwana
नांदेड
परतीच्या पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शेत पिकांची कित्येक घरांची पडझड होऊन प्रचंड नुकसान झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना व शेतमजूरांना तातडीने दिलासा द्यावे महाराष्ट्रात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. शेतकऱ्यांचे तयार झालेले पिक या परतीच्या पावसामुळे पुर्ण पणे नष्ट झाली आहेत.महोदय आधिच कोवीड-१९ मुळे अर्थिक संकटात सापडलेला शेतकरी या सोबतच असंघटित शेतमजूर कामगारांची आर्थिक बाबतीत दयनीय अवस्था झाली आहे. शेतमजूर हा वर्ग मोल मजूरी करून आपला उदरनिर्वाह चालवणारा वर्ग आहे आपलाप्रपंच मजूरी करून भागवतो आहे,कोवीड-१९ महामारीमुळे लाॅकडाउन मध्ये व्यवसाय मजूरी बंद होती आणि या झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतातील लागणारे कामे पूर्णपणे नाहीसे झाले आहेत अशा परिस्थितीत आपली उपजिवीका कशी भागवावी! अशा वेळी त्यांना आपल्या शासनाच्या मदतीची गरज आहे, म्हणून आपण पंचनामे करून सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रूपये व ऊसाला हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत लवकरात लवकर द्यावी यासह पावसामुळे घरांची पडझड झालेल्या बांधवांना मदत द्यावी तसेच शेतमजुर कामगारांची ग्रामस्तरावर सर्वेक्षण करून या असंघटित नोंदणी नसणारे शेतमजूर कामगारांना आपल्या शासनाकडून अर्थिक भरीव मदत द्यावी! शेतकरी व सेतमजुरांना मदतीची अत्यंत गरज आहे,अशी मागणी एका निवेदनातून सामाजिक कार्यकर्ता शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे केले आहेत,