शारदीय नवरात्रोत्सव निमित्ताने देवीचे रूप मानले गेलेल्या नवदुर्गा महिला पोलीस,महिला डाॅक्टर,परिचारिका यांचा सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी केले सन्मान व सत्कार
Anil makwana
नायगांव
शारदीय नवरात्रोत्सव निमित्ताने राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतीकारी स्मृतीस त्रिवार वंदन करून सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी नायगांव पोलीस स्टेशन येथील महिला पोलीस तसेच नायगांव शासकीय ग्रामीण रूग्णालयातील महिला डाॅक्टर,परिचारिका यांनी नवदुर्गा देवीचे तत्व अंगीकारून आपल्या कार्य क्षेत्रातमध्ये 24 तास अतिशय उल्लेखनीय,खंबीरपणे, उत्तुंग, मह्त्वाची भुमिका बजावत कामगिरी करून समाजाचे कल्याण करणाऱ्या या आधुनिक नवदुर्गा स्त्री शक्तीचा सन्मान व सत्कार शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी केले, यावेळी नायगांव पोलीस स्टेशनचे स.पो.पोलीस निरीक्षक मा.गजानन गुलाबराव पाटेकर साहेब अदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते, नवरात्र म्हणजे नवदुर्गा नवदुर्गा म्हणजेच महिला पोलीस, महिला डाॅक्टर, परिचारिका, अदी विविध क्षेत्रात देशासाठी समाजासाठी दिवस रात्र कार्य करणाऱ्या अशा आपल्या माता भगिनी नवदुर्गा हिच वास्तव रूपं आहेत भारतीय संस्कृतीने समाजात स्त्री आणि पुरुषांना समान स्थान दिले.प्रत्येक कार्यात, प्रत्येक क्षेत्रात स्त्रीला बरोबरीने वागणूक देण्याची भारतीयांची अनादिकाळापासून परंपरा आहे. म्हणूनच आपल्या संस्कृतीत स्त्रीला शक्तीस्वरूप मानले जाते. अशा स्त्री शक्तीचा सन्मान करणे हेच आमचे भाग्य आहे, आणि नवरात्री उत्सवाचे खरे सार असे मत सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर आमच्या न्युजशी बोलताना व्यक्त केले,